¡Sorpréndeme!

Pune | Khadakwasla धरणसाखळी प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड टीएमसी पाणीसाठा कमी |Water Supply

2022-04-13 332 Dailymotion

उन्हाळय़ामुळे होत असलेले बाष्पीभवन, पाण्याची वाढती मागणी, पाणीगळती या कारणांचा हा परिणाम आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या ४४ टक्के पाणीसाठा आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत चारही धरणांत १५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून १३.१० टिएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

#Pune #Khadakwasla #PuneWaterSupply #Sakal #PuneNews #KhadakwaslaDam